राज्यात (Maharashtra)यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात सध्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत घट झाली आहे.
यंदा नाशिकमध्ये (Nashik) पुरेसा पाऊस न झाल्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये पावसाने सरासरीही न गाठल्याने जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यात भूजळ पातळीत घट झाली आहे. आतापर्यंत ही भूजल पातळी (Ground Water level) २.१३ मीटरपर्यंत घटली आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणोचा अहवाल आला आहे. विभागाने १८५ विहिरींच्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल सादर केला आहे. (Latest News)
नाशिकमध्ये दिडोंरी तालुक्यात किमान ०.५ तर चांदवड तालुक्यात २.१३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाली आहे. भूजल पातळी घटल्याने जिल्ह्यात दुष्काळाचा निर्देशांक वाढला आहे.
भूजल पातळी घटल्याने जिल्ह्यावरील पाणीसंकट अधिक गहिरं झाले आहे. डिसेंबरपासूनच विहिरी आणि बोअरवेलमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पोहचवले जायचे. परंतु या वर्षी मात्र, डिसेंबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीटंचाईमुळे दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक (Nashik) ०.२८ मीटर
चांदवड २.१३ मीटर
बागलाण १.११ मीटर
निफाड १.२८ मीटर
मालेगाव १.२४ मीटर
कळवण १.२० मीटर
येवला (Yeola) ०.७० मीटर
सिन्नर ०.४६ मीटर
सुरगाणा ०.३६ मीटर
नोव्हेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा
नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात गंगापूर धरणात ८४ टक्के पाणीसाठा, कश्यपी ९९ टक्के, गौतमी गोदावरी ९६ टक्के, आळंदी ९० टक्के, पालखेड ३३ टक्के तर दारणा 82 टक्के, मुकणे 86 टक्के, वालदेवी धरणात 95 टक्के पाणीसाठा होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.