Nashik Crime News: नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूर ड्रग्ज कारखान्यातून फरार तस्कराच्या आवळल्या मुसक्या

Umesh Wagh News: गेल्या ३ महिन्यांपासून उमेश वाघ बंगलोर, केरळ, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी लपून बसला होता. उमेश वाघ सोलापूर येथील कारखान्यात बनवलेले ड्रग्ज नाशिकच्या सनी पगारे याला विकत होता.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam TV
Published On

Abhijeet Sonawane

Crime News:

नाशिक पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सोलापूर (Solapur) ड्रग्ज कारखान्यातील फरार असलेला तस्कर उमेश वाघ नाशिक पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. विरार येथून उमेश वाघला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट १ ने ताब्यात घेतलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime News
Kalyan Crime News: धक्कादायक! मुख्याध्यापिका पत्नीचं निर्दयी कृत्य, पतीला जाळून मारण्यासाठी मुलीच्या मित्रांची घेतली मदत

गेल्या ३ महिन्यांपासून उमेश वाघ बेंगलोर, केरळ, हैद्राबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी लपून बसला होता. तसेच पोलिसांपासून पळ काढत होता. उमेश वाघ सोलापूर येथील कारखान्यात बनवलेले ड्रग्ज नाशिकच्या सनी पगारे याला विकत होता. उमेश वाघ पोलिसांच्या हाती लागल्यानं राज्यातील ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणातील फॉर्म्युला देणाऱ्या उमेश वाघच्या मदतीने अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अंमली पदार्थ कसलीही भीती न बाळगता विकले जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील तरुणांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे आयुष्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाशिकमध्ये ललित पाटील प्रकरणाचा देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक (Nashik) पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

नाशिकमध्ये ड्रग्स कारखाना सुरू करण्याचा प्लॅन पुण्याच्या जेल आणि ससून हॉस्पिटलमध्ये शिजला. ललित पाटीलने भाऊ भुषण पाटीलला ड्रग्स तयार करणाऱ्या व्यक्तीशी ओळख करून दिली. हरीश पंत याने नाशिकच्या शिंदे परिसरात ड्रग्स कारखान्याचं सेटअप केलं होतं. जानेवारी 2023 पासून या कारखान्यात ड्रग्स तयार करण्याचं काम सुरू झालं.

आत्तापर्यंत अंदाजे 12 ते 15 कोटी रुपये या कारखान्यात तयार झालेल्या ड्रग्समधून कमवण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. महिन्याला 70 ते 80 किलो ड्रग्स या कारखान्यात तयार केलं जात होतं. तसेच 3 लाख रुपये किलो दराने याची विक्री केली जात होती. नाशिकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या ड्रग्सची मुंबईत विक्री केली जात होती.

Nashik Crime News
Dhule Crime: नशेचं औषधं विकणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश; गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com