Water shortage in Marathwada even during rainy season Water supply through tankers in 63 villages Saam TV
महाराष्ट्र

Water Crisis: भर पावसाळ्यातही मराठवाड्यात पाणीटंचाई; तब्बल ६३ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा, शेतकरी चिंतेत

Marathwada Water Crisis: राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरू असला, तरी मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पाण्याअभावी मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Marathwada Water Crisis

राज्यातील काही भागात सध्या जोरदार पाऊस सुरू असला, तरी मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पाण्याअभावी मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालनासह अनेक भाग पावसाळ्यातही तहानलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. अहवालातून दोन्ही जिल्ह्यांमध्ये ८९ टँकर्सने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे सर्वाधिक २० टँकरने पैठण तालुक्यात पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे खरीपासह इतर पिकांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे विहीरी कोरड्या असल्यामुळे ग्रामीण भागातील गावकऱ्यांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (Latest Marathi News)

भर पावसाळ्यातही मराठवाड्यात पाणीटंचाई

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील ३९ गावात आणि ५ वाड्यांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच जालना जिल्ह्यातील २४ गावात आणि १७ वाड्यांमध्ये तीन शासकीय आणि ३६ खासगी टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. पैठण तालुक्यातील ५ वाड्या, जालना तालुक्यातील ३, बदनापूरातील ६, भोकरदन १ आणि मंठामधील १ वाड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

या गावांमध्ये टँकरचे पाणी

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ११, फुलंब्री तालुक्यातील १, पैठण २०, गंगापूर १, सिल्लोड तालुक्यातील ६ गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय जालना तालुक्यातील ५, बदनापूर ८, भोकरदन ३ ,जाफ्राबाद, घनसावंगी तालुक्यात प्रत्येकी ४ गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

मराठवाडा विभागातील धरणातील पाण्याची पातळी (टक्केवारीत)

जायकवाडी धरण - 30.66 टक्के पाणीसाठा

निम्न दुधना - 25.38 टक्के पाणीसाठा

येलदरी धरण - 61.48 टक्के पाणीसाठा

सिद्धेश्वर धरण - 58.91 टक्के पाणीसाठा

माजलगाव धरण - 11.19 टक्के पाणीसाठा

मांजरा धरण - 24.11 टक्के पाणीसाठा

पैनगंगा धरण - 72.32 टक्के पाणीसाठा

मानव धरण - 60.02 टक्के पाणीसाठा

निम्र पेरणा धरण पंचवीस- 25.09 टक्के पाणीसाठा

विष्णुपुरी धरण - 90.38 टक्के पाणीसाठा

सीना कोळगाव - 0.00 टक्के पाणीसाठा

एकूण पाणीसाठा - 44.47% टक्के

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT