पाण्यासाठी आता पुन्हा एकदा सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या 65 गावांनी (65 villages of jat demands water) आरपारची लढाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून पाणी देण्यास विलंब होत असल्याने थेट कर्नाटक सरकारला रक्तदान करून पाणी देण्याचे साकडे घालण्याचा ठराव संख गावात पार पडलेल्या दुष्काळी परिषदेमध्ये घेण्यात आला आहे. (Maharashtra News)
पाणी संघर्ष समितीचे नेते तुकाराम बाबा महाराज (tukaram baba maharaj) यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील विविध मठांचे मठाधिपती त्याचबरोबर प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले (actor nagesh bhosale) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुष्काळी परिषद (dushkal parishad) संपन्न झाली. यावेळी जत तालुक्यातल्या 65 गावातील दुष्काळग्रस्तांनी हजेरी लावली होती. संत बागडेबाबा महाराजांच्या मठात पार पडलेल्या परिषदेमध्ये पाण्यासाठी तीव्र संघर्ष उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
त्याचबरोबर तालुक्यातील आलेले म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावं यासह विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे दुसरी टेंडर प्रक्रिया राबवावी, अन्यथा पाण्यासाठी पुढील आंदोलन पंधरा दिवसात थेट कर्नाटकच्या सीमेवर जाऊन दुष्काळग्रस्त रक्तदान करून रक्त कर्नाटक सरकारला दान करून पाणी देण्याचे साकडे घालतील असा इशारा यावेळी परिषदेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांनी राज्य सरकारला दिला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.