amravati, water scarcity saam tv
महाराष्ट्र

Amravati Water Scarcity: पाणी टंचाई ! अमरावती जिल्ह्यातील 22 गावांची पाण्यासाठी वणवण

Amravati Water Crisis News: पाण्याचा प्रश्न लवकर सुटावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : अमरावती जिल्ह्यात 22 गावांना एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने विविध पद्धतीने पाणी पुरवठा सुरू आहे. मेळघाटातील (melghat) धारणी (dharni) व चिखलदरा (chikhaldara) हा आदिवासी बहुल अतिशय दुर्गम भाग समजला जातो. या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. (Maharashtra News)

मेळघाटातील (melghat) खडीमल गावातील लोकांना गेल्या एक वर्षा पासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा योजना याठिकाणी कुचकामी ठरलेली आहे.

अनेक गावांमध्ये अजूनही पाईपलाईन केली गेली नाही. तर त्या गावातील विहिरी आटल्यामुळे गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने गावातील महिलांना पुरुषांना 2-3 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी पाणी आणावे लागते आहे.

मागील वर्षी संपूर्ण प्रशासन, आमदार, खासदार ,मंत्री याच गावात तळ ठोकून होते. मात्र अजूनपर्यंत या गावातील पाणी प्रश्नावर तोडगा काही निघालेला नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : नाकावर ब्लॅकहेड्स वाढले आहेत? जाणून घ्या घरच्या घरी करता येणारे ७ सोपे उपाय

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेकडून दसऱ्याचा मुहूर्त

Tuesday Horoscope : दसऱ्याचा दिवस शुभ ठरणार, मोठे अडथळे दूर अन् काहींना होणार धनलाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

SCROLL FOR NEXT