water cuts in nashik for two days saam tv
महाराष्ट्र

Nashik Water Cut: नाशिककरांनो पाणी जपून वापरा, सलग दाेन दिवस 12 प्रभागात पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Nashik Municipal Corporation News : नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन नाशिक महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Water Crisis:

नाशिक शहरातील अनेक भागात उद्या बुधवार (ता. 27) आणि गुरुवारी (ता. 28) पाणीपुरवठा हाेणार नाही. शहरातील तब्बल 12 प्रभागांमध्ये पाणी पूरवठा हाेणार नसल्याची माहिती नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) दिली आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे. (Maharashtra News)

नाशिक शहराला पाणी पूरवठा करणा-या शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रात यांत्रिकी आणि अन्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे दाेन दिवस शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे.

नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार उद्या (बुधवार) सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम विभागातील १२ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी (ता. 27 मार्च) सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणी पुरवठा हाेईल असे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन नाशिक महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जुबेर हंगरेकर याच्या संपर्कातील तरुण सोलापुरातून ताब्यात

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT