water crisis looms in yavatmal and buldhana Saam Digital
महाराष्ट्र

Water Crisis Hits Yavatmal: पाणीसाठण्यात घट; पैनगंगा नदीकाठच्या 42 गावांना टंचाईचा झळा, बुलढाण्यातील येळगाव धरणात केवळ 17 टक्के पाणीसाठा

Siddharth Latkar

- संजय राठाेड / संजय जाधव

दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याची स्थिती आहे. उमरखेड तालुक्यातील 42 गावांना सध्या पाणीटंचाईचा तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. तर बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे बनले आहे. (Maharashtra News)

पैनगंगा नदी काठावरील गावांत पाण्याची भीषण स्थिती

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम जंगल भाग व पैनगंगा नदी काठावरील गावे पाणी टंचाईचा झळा सोसत आहेत. बंदी भागातील आणि नदी काठावरील 42 गावांना सध्या पाणीटंचाईचा तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत.

टंचाईमुळे विदारक स्थिती निर्माण झाली असून जंगल भागातील लोक स्थलांतर करू लागले आहेत. तसेच नदी काठावरील शेतातील पिके पाण्याविना करपू लागली असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

बुलढाणेकरांना करावा लागणार भीषण पाणी टंचाईचा सामना

बुलढाणा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात आजघडीला केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ही बाब चिंताजनक असल्याची चर्चा आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मे महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याने बुलढाणा शहरवासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तर बुलढाणा शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन बुलढाणा नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT