water crisis in marathwada 1803 tanker supplies water in vilages Saam Digital
महाराष्ट्र

Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

मराठवाड्यातील 1हजार 224 गावे आणि 486 वाड्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीला मराठवाड्यातील टँकरची संख्या ही 1800 च्या वर पोहोचली आहे. सर्वाधिक टँकर हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मराठवाड्याला आता टँकर वाड्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून येत आहे. (Maharashtra News)

मराठवाड्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विभागातील लघु मध्यम आणि मोठे या सर्वच प्रकल्पांनी तळ गाठलाय. शिवाय उन्हाची ही तीव्रता यंदा अधिक असल्याने भूगर्भातील जलसाठा ही खाली गेल्यामुळे विहिरी आणि बोरवेल देखील कोरडे पडलेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आता हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करताना दिसत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात टँकर सुरू असतानाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या अजून कायमच आहे.

सद्यस्थितीत कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरू

छत्रपती संभाजीनगर- 695

जालना- 490

बीड- 418

धाराशिव-132

लातूर- 26

परभणी 14

नांदेड 21

हिंगोली 7.

एकूण - 1803

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा या संभाजीनगर जिल्ह्याला बसत असून त्या खालोखाल जालना जिल्ह्याचा नंबर लागतोय. त्यामुळे ही परिस्थिती अजून अशीच राहिली तर प्रशासनाला टँकरच्या संख्येत वाढ करावी लागेल हे मात्र निश्चित. अशातच मराठवाडा हा टँकर वाडा बनण्यापासून वाचेल का हे आता येणारा काळच सांगेल.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT