Water crisis in 76 cities of Marathwada crops in crisis due to lack of rain ssd92 Saam TV
महाराष्ट्र

Marathwada Water Shortage: मराठवाड्यातील तब्बल ७६ शहरांवर जलसंकट; पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या, बळीराजा संकटात

Marathwada Water Crisis: ऑगस्ट महिना सुरू होताच, पावसाने दांडी मारली. तब्बल २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यानं मराठवाड्यातील १७० मंडळातील पिके माना टाकत आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Marathwada Water Crisis: जून महिन्याच्या अखेरीस राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने जुलै महिन्यांत अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली. मात्र, ऑगस्ट महिना सुरू होताच, पावसाने दांडी मारली. तब्बल २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यानं मराठवाड्यातील १७० मंडळातील पिके माना टाकत आहेत.

मराठवाड्यातील एकूण ४६८ मंडळापैकी १७० मंडळांत अपेक्षित पावसाच्या २५ ते ७५ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील २१ मंडळात अपेक्षेच्या २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे.

दुसरीकडे समाधारक पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये काही महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट ओढवण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्याचे वांधे होणार असं चित्र आहे.

नुकताच छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाने राज्य शासनाला याबाबतचा अहवाल पाठवला असल्याचं सांगितलं जातंय. त्या अहवालात मराठवाड्यातील ६ तालुक्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत तर ९ तालुक्यांना ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा जवळच्या प्रकल्पांमध्ये असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

यातील ५ तालुक्यांना नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत ३६ तालुक्यांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पिण्याचे पाणी देणे शक्य होईल. उर्वरित १५ पैकी १० तालुक्यांना जानेवारी २०२४, मार्च २०२४ पर्यंत तर ५ तालुक्यांना वर्षभर पाणीपुरवठा होईल, एवढा साठा प्रकल्पात आहे. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून ६८ दिवसांमध्ये फक्त ४९ टक्के पाऊस झाला.

गेल्यावर्षी मराठवाड्यात ८० टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा नांदेडमधील काही तालुके वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठ्या ११ जलप्रकल्पांसह मध्यम व लघु ८६६ प्रकल्प, बंधाऱ्यांवर अवलंबून शहर, गावांना पाणीटंचाईची भीती आहे. सिल्लोड, कन्नड, गंगापूर, सोयगाव भोकरदन, बदनापूर किनवट, बिलोली अर्धापूर, माहूर या तालुक्यात ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल इतकं शिल्लक आहे.

वैजापूर, फुलंब्री पूर्णा, धर्माबाद, मुदखेड, लोहारा तालुक्यात सप्टेंबरपर्यंत पाणी पुरेल इतकं आहे. ऑक्टोबरपर्यंत तग धरू शकतील अशा तालुक्यात घनसावंगी, जाफ्राबाद, हदगाव, भोकर, अंबाजोगाई, परळी, गेवराई, पाटोदा, शिरूर कासारचा समावेश आहे. जायकवाडीच्या पायथ्याला असलेल्या पैठणसह खुलताबाद कुंडलवाडी, शिरुर अनंतपाळ, देवणी, रेणापूर तालुक्यात नोव्हेंबरपर्यंत पुरेल इतके सध्या पाणी उपलब्ध आहे.

डिसेंबरपर्यंत पाणी उपलब्ध असणारे तालुक्यांमध्ये, परतूर मंठा, तीर्थपुरी मानवत, पाथरी, सेलू, पालम, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, लोहा, मुखेड, हिमायतनगर, नायगाव, बीड माजगाव, धारूर, वडवणी, आष्टी, अहमदपूर, औसा, चाकूर, धाराशिव, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरुम, कळंब, भूम, परंडा, वाशी यांचा समावेश आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: मनसे अन् शिवसेना युतीवर खासदाराचं सूचक विधान; विजयी मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?

Courtroom Drama Series: 'जॉली एलएलबी' सारखीच मनोरंजक आहेत 'या' कोर्टरूम ड्रामा सिरीज, या विकेंडला करा बिंज वॉच

Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात सनस्क्रीन वापरताय? तर 'ही' गोष्ट लक्षात ठेवा

Raw Banana Fry Recipe: भूक लागलीये? फक्त १० मिनिटांत तयार करा चवदार कच्ची केळी फ्राय

Anshula Kapoor Engaged: कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार! अंशुला कपूरच ठरलं; बॉयफ्रेंडनं 'या' ठिकाणी केलं प्रपोज

SCROLL FOR NEXT