वाशिम जिल्हा परिषदे मध्ये महाविकास आघाडी पास! Saam TV
महाराष्ट्र

वाशिम जिल्हा परिषदे मध्ये महाविकास आघाडी पास!

14 जिल्हा परिषद सदस्यांपैकी पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळविल्याने जिल्हा परिषद मध्ये 14 जागा घेऊन जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे.

गजानन भोयर

वाशिम: सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) ओबीसींचं राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द ठरविल्यानंतर राज्यातील पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुकीत वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. 14 जिल्हा परिषद सदस्यांपैकी पैकी 5 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळविल्याने जिल्हा परिषद मध्ये 14 जागा घेऊन जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे, तर काँग्रेस 11 जागा घेवून दोन नंबर वर आहे. शिवसेना 6 जाग्यावर कायम असल्याने, ही पोटनिवडणुक राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी साठी फायद्याची झाली आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण 14 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज घोषित झाला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने 5 जागांवर विजय मिळविला. शिवसेनेला आपली कमी झालेली एक जागा राखण्यात यश आले आहे.त्यामुळं वाशिम जिल्हा परिषदेवर पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

वाशिम 14 जि प निकाल जाहीर विजयी उमेदवार

1) शिवसेना - सुरेश मापारी ,उकळी पेन जीप सर्कल

2) काँग्रेस - वैभव सरनाईक ,जीप कवठा सर्कल

3) काँग्रेस - संध्या ताई देशमुख ,जीप काटा सर्कल

4) वंचित - वैशाली लळे - जीप भामदेवी सर्कल

5) वंचित -लक्ष्मी लहाने, जीप पांघरी नवघरे सर्कल

6)राष्ट्रवादी - चंद्रकांत ठाकरे , जीप असेगाव सर्कल

7) राष्ट्रवादी- अमित खडसे, जीप,भर जहागीर सर्कल

8) राष्ट्रवादी - सुनीता कठोले ,जीप, कंझरा सर्कल

9) राष्ट्रवादी - राजेश राठोड , जीप,दाभा सर्कल

10) राष्ट्रवादी -शोभा गावंडे ,जीप,तळप सर्कल

11) भाजप - उमेश ठाकरे, जीप,कुपटा सर्कल

12) भाजप - सुरेखा चव्हाण ,जीप, फुल उमरी

13) अपक्ष - स्वरस्वती चौधरी,जीप,पार्डी सर्कल

14) जनविकास आघाडी - पूजा भुतेकर , जीप,गोभणी सर्कल

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

Diabetes: डायबिटीज कंट्रोल होत नाहीये? या गोष्टीची कमी वाढवू शकतं टेन्शन

SCROLL FOR NEXT