Washim Accident News Saam TV
महाराष्ट्र

Washim Accident News : वाशिममध्ये प्रवासी ऑटो आणि कारचा भीषण अपघात; चार जण गंभीर जखमी

Accident News : यावेळी समोरून येणाऱ्या कारची आणि प्रवासी ऑटोची एकमेकांना जोरदार धडक झाली. या घटनेत दोन्ही वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल

Washim News :

वाशिममधील कारंजा येथे प्रवासी ऑटो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात (Accident) ऑटोतील चार जण जखमी झालेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा -दारव्हा मार्गावरील सावंगी फाट्याजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो कारंजाहून धामणगाव देव येथे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या कारची आणि प्रवासी ऑटोची एकमेकांना जोरदार धडक झाली. या घटनेत दोन्ही वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहीका देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोदेगाव व लोही येथील सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला घेत वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.

ट्रक- कारचा अपघात; धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग

वेगमर्यादा ओलांडल्याने अपघाताच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काल अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातल्या तिवसा गावात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांना आग लागली. आगीमध्ये ट्रक आणि कार जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT