washim news saam tv
महाराष्ट्र

Washim News : वाळकी मांजरेतील गोळीबार प्रकरणी दाेन युवकांना हिंगाेलीतून अटक

सुजाण नागरिकांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र धारकांची माहिती असल्यास पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim Crime News : वैयक्तिक वादातून भांडण विकोपाला गेल्याने दोन युवकांवर अग्निशस्त्राने गोळीबारासह कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद करण्यात वाशिम शहर पोलीसांना यश आले आहे. या दाेन्ही संशयितांना हिंगाेली जिल्ह्यातून पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

१४ ऑगस्टच्या रात्री निमजगा ते वाळकी मांजरे रोडवर जुन्या वैयक्तिक वादातून दोन युवकांवर अग्निशस्त्राने गोळीबारासह कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला चढविण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून वाशिम शहर पाेलिस संशयितांच्या मागावर हाेते.

दरम्यान गोपनीय माहितीवरून वाशिम शहर पाेलिसांच्या तपास पथकाने या प्रकरणातील २ संशियतांना हिंगाेली जिल्ह्यातून ताब्यात घेतले. या दाेघांना कनेरगाव नाका (जिल्हा हिंगोली) येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान पोलिस उपनिरिक्षत सचिन गोखले अधिक तपास करत आहेत.

नागरिकांनी पुढे यावे

सुजाण नागरिकांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र धारकांची माहिती असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL ११२ ला द्यावी. माहिती देणा-या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

SCROLL FOR NEXT