Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : अवैध दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार; पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचे शोले स्टाईल आंदोलन

Washim News : वाशिमच्या वारला, टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारू विक्री करण्यात येत असते. टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा गावात अवैध दारू विक्रेत्यांनी नुसता धुमाकूळ घातला

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: गावात सुरू असलेली अवैध दारू विक्रीचा धंदा वाढत चालला आहे. यामुळे गावात तंटे वाढले असून दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. अनेकदा मागणी केल्यानंतर देखील दारूबंदी होत असल्याने अखेर आज महिलांनी गावातील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

वाशिमच्या वारला, टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारू विक्री करण्यात येत असते. टनका, सोनगव्हाण, पांगरखेडा गावात अवैध दारू विक्रेत्यांनी नुसता धुमाकूळ घातला असून अवैध दारू विक्रीमुळे कित्येक महिलांचे घर उध्वस्त झाले आहेत. त्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे. गावात देखील वाद वाढलेले पाहण्यास मिळत आहेत. यामुळे अनेक दिवसांपासून दारू बंदी करण्याची मागणी करण्यात येत होती. 

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष 

दरम्यान गावात सहजपणे पहाटेपासूनच तळीरामांना दारू मिळत असल्यामुळे गावाचे वातावरण दूषित झाले आहे. गावांची शांतता व सुव्यवस्था भंग पावली आहे. अनेक महिला तसेच शाळकरी मुली या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी; अशी मागणी गावातील महिलांकडून करण्यात येत होती. मात्र पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. 

तीव्र आंदोलनाचा इशारा 

गावात सुरु असलेली अवैद्य दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी वज्रदेही महिला विकास संघाच्या महिला थेट वारला गावातील पाण्याच्या टाकीवर चढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन केले. महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दारूबंदी करण्याची मागणी केली आहे. दारू बंदी करा अन्यथा त्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

SCROLL FOR NEXT