Washim ZP Saam tv
महाराष्ट्र

Washim ZP : जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम; विनापरवानगी झेडपी आवारात दिसल्यास होणार कारवाई

Washim News : काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदचे सीईओ वैभव वाघमारे हे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकतात; असा आरोप करत यांच्या बदलीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्हा परिषदेने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या ११ ऑक्टोबरच्या आदेशानुसार यापुढे विनापरवानगी जिल्हा परिषदेत आलेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ अंतर्गत प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याचे आदेशच काढले आहेत.

वाशिम (Washim) जिल्हा परिषदेने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या निर्देशानुसार यापुढे विनापरवानगी जिल्हा परिषदेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल. असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी (Zilha Parishad) जिल्हा परिषदचे सीईओ वैभव वाघमारे हे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकतात; असा आरोप करत यांच्या बदलीसाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. 

शाळा सोडून शिक्षक जिल्हा परिषदेत 

काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या वेळेत कार्यालय सोडून जिल्हा परिषदेत येत असतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सीईओ वैभव वाघमारे कर्मचारी विरुद्ध आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT