Washim Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Washim Water Crisis : वाशीम जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्र झळा; ७७ लघु सिंचन प्रकल्पानी गाठला तळ, केवळ १८ टक्के जलसाठा

Washim News: पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात गंभीर होत चालला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. हीच परिस्थिती वाशीम जिल्ह्यात निर्माण झाली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या ७७ लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील ७७ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला आहे. 

पाणीटंचाईचा प्रश्न राज्यात गंभीर होत चालला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. हीच परिस्थिती वाशीम जिल्ह्यात निर्माण झाली असून जिल्ह्यात असलेल्या लघु सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिम तालुक्यातील दगडपारवा, कोंढाळा महाली आणि मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरी महादेव येथे  टँकर ने पाणीपुरवठा सुरू आहे.

गावांमध्ये टँकरची उपाययोजना 
वाशिम जिल्ह्यात प्रशासनाकडून सध्या ४३ ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. तर ३ गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्याअंतर्गत यंदा १९९ गावांसाठी एकूण २१४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार पाणीटंचाईग्रस्त गावांत विहीर अधिग्रहण व टँकर अशा दोन प्रमुख उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

नंदुरबारमध्ये पाणी कपात 

पाणीटंचाईची भीषणता वाढत चालली असून नंदुरबार शहरात देखील पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. १ मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाबरोबरच आता शहरी भागातही पाणीटंचाईची झड बसण्यास सुरवात झाली आहे. आंबेबारा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने आष्टा पंपिंग सेंटर बंद झाले असून शहराला वीरचक आणि आंबेबारा या दोन धरणातून पाण्याचा पुरवठा होत असतो. मात्र वीरचक धरणात ५७ टक्के जलसाठा असून दुसऱ्या पंपिंग स्टेशन वरून पूर्ण शहराचे पाणीचे नियोजन करण्यात येत असल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT