Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १९ जणांवर गुन्हा दाखल

Washim News : शहरात अवैधपणे जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने छापेमारी करत कारवाई केली आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या मंगरूळपीर शहरातील भगतसिंह चौक व मरीमाता मंदिर परिसरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत एकूण १२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर कारवाईत १९ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशिमच्या मंगरुळपीर शहरात अवैधपणे जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या पथकाने छापेमारी करत कारवाई केली आहे. यातील मरीमाता मंदिराजवळील टिनशेडवर छापा टाकून ६ लाख ३० हजार ४०० रुपये, तर राजधानी गेस्ट हाऊसमधून ६ लाख १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. 

१९ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल 

धाडीत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन व इतर साहित्याचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्व १९ जणांना अटक केली असून,मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई SDPO नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे शहरात पुन्हा एकदा अवैध जुगार अड्ड्यांवर वचक बसला आहे.

जालन्यात पाच लाखांची देशी आणि विदेशी दारू नष्ट

जालना : जालन्यात चंदनझिरा पोलिसांनी पाच लाखांची देशी आणि विदेशी दारू नष्ट केली आहे. विविध कारवायांमध्ये पोलिसांनी ही दारू जप्त केली होती. जालना दारूबंदी विभागाच्या परवानगीने चंदंनजिरा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ५० गुन्ह्यातील साडेपाच लाख रुपये किमतीची देशी- विदेशी दारू नष्ट करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

SCROLL FOR NEXT