Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलन

Washim News : शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वाशीमच्या तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खावून काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिममध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वाशीमच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी शिदोरी आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या; अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आली.

वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. जाहीर केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून मिळालेली मदत ५० टक्के किंवा त्याहून कमी जमा झाल्याने रोष व्यक्त केला. 

चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी 

याच्या निषेधार्थ आज शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने वाशीमच्या तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खावून काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनमाड बाजार समिती कर्मचाऱ्यांचे काळी दिवाळी निषेध आंदोलन
मनमाड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिस जवळ विविध मागण्यांसाठी काळी दिवाळी निषेध आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सानुग्रह अनुदान, बोनस अशा विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या ऑफिसला काळा आकाश कंदील लटकवत आंदोलन सुरू केले असून ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT