Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून मुलीने काढला पळ; निरीक्षण गृहातील मुलगी सहा दिवसांपासून बेपत्ता

Washim News : निरीक्षण गृहाच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्याच्या बहाण्याने मुलगी गॅलरीत आली. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत काही कळायच्या आत १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळून बाहेर पडली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिममधील महिला व बालविकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहातून सहा दिवसांपूर्वी एक १६ वर्षीय अल्वयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. या मुलीने निरीक्षण गृहाच्या १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळ काढला आहे. सहा दिवसांपासून या मुलीचा शोध सुरु असून अद्याप तिचा तपास लागला नसून निरीक्षण गृहात खळबळ उडाली आहे. 

वाशिम शहरात पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचालित महिला व बालविकास विभाग अंतर्गत अनुदानित दिशा मुलींचे निरीक्षण गृह आहे. अनाथ तसेच गुन्हेगारी प्रकरणांत सहभागी असलेल्या किंवा हरवलेल्या मुलींना संरक्षण दिले जाते. त्यानुसार अनेक मुली या निरीक्षण गृहात वास्तव्यात आहेत. दरम्यान या निरीक्षण गृहात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक फरार झाल्याने खळबळ उडाली आहे. 

कपडे टाकण्याच्या बहाण्याने गेली गॅलरीत 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारी निरीक्षण गृहाच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्याच्या बहाण्याने सदर मुलगी गॅलरीत आली. यानंतर तिने आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधत काही कळायच्या आत १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळून बाहेर पडली आणि फरार झाली आहे. तिचा शोध घेतला असता सापडून आली नसून तिचा कोणताच पत्ता अद्याप लागलेला नाही.

पोलिसात केली तक्रार 

निरीक्षण गृहातून मुलीने पलायन केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील तपास करत मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र त्या अल्पवयीन मुलीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे केवळ प्रशासनावरच नव्हे; तर बाल संरक्षण यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

Crime: अशोक खरातनंतर आणखी एका भोंदूचा कारनामा, फार्म हाऊसवर बोलावलं, भूतप्रेत उतरवतो सांगून महिलेवर बलात्कार

Maharashtra Live News Update: हार्बर मार्गावरील नेरूळ जुईनगर स्थानक दरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT