Washim News Saam Tv
महाराष्ट्र

Washim Police : बंदी असताना विसर्जन मिरवणुकीत वाजविला डिजे; १७ मंडळांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

Washim News : राज्यात अनेक ठिकाणी यावर बंदी करण्यात आली होती. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात देखील विसर्जन मिरवणुक दरम्यान डिजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे व लेझर लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली होती. वाशीम जिल्ह्यासाठी हे आदेश लागू असताना देखील विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून डीजे वाजविण्यात आला. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ मंडळांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच या मंडळांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मोठ्या मंडळांकडून डीजे तसेच लेझर लाईटचा वापर करण्यात येत असतो. मात्र याचा त्रास होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी यावर बंदी करण्यात आली होती. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात देखील विसर्जन मिरवणुक दरम्यान डिजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले होते. तरी देखील अनेक मंडळांकडून डीजे लावून जोरदार गाणे वाजविण्यात आले होते. 

१७ मंडळावर पोलिसांची कारवाई 

लाडक्या गणरायाला निरोप दिल्यानंतर वाशिम शहरातुन विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. काल पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन करत डिजे लावल्याचे निदर्शनास आले होते. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७ डिजेवर वाशिम शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मिरवणूक संपल्यानंतर हे सर्व डीजे शहर पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले होते.

प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंड 

डीजेच्या प्रत्येक वाहनाला १५ ते २० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून डेसिबलची मर्यादा ओलांडल्या प्रकरणी नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मिरवणुकी आधीच गणेश मंडळांना डीजे न वापरण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात डीजे चा वापर करण्यात आला त्यानंतर आता पोलिसांनी या सर्व डीजेंवर कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

Gold Price : दसऱ्याच्या आधीच सुवर्ण झळाळी; सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, एकाच दिवसात १५०० रुपयांनी वाढ

Politics : काँग्रेसचा 'पायलट' प्रोजेक्ट! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन राज्यांत मोठी उलथापालथ होणार

Pakistan Cricket Team : आशिया कपमध्ये पराभूत झाल्यानंतर पीसीबीचा महत्वाचा निर्णय; पाकिस्तानी खेळाडूवर मोठी कारवाई

Pandharpur : पंढरपुरात रेशन धान्याचा काळाबाजार; शिवसेना पदाधिकाऱ्यांची धाड, कारवाईस टाळाटाळ

SCROLL FOR NEXT