Risod Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Risod Vidhan Sabha : रिसोड मतदारसंघावर भाजप, शिवसेना दोघांचाही दावा; मित्र पक्षातील दोन्ही उमेदवार भरणार अर्ज

Washim News : वाशिमच्या रिसोड मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटली असल्याने याठिकाणी भावना गवळी या उमेदवार आहेत. मात्र भाजपचे अनंतराव देशमुख यांनी देखील उमेदवारी दाखल करण्यावर ठाम आहेत.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये अजूनही रस्सीखेच सुरु आहे. महायुतीतील भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून रिसोडवर दावा केला आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी भाजप कडून आज ७५ वर्षीय अनंतराव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

वाशिमच्या (Washim) रिसोड मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटली असल्याने याठिकाणी भावना गवळी या उमेदवार आहेत. मात्र भाजपचे अनंतराव देशमुख यांनी देखील उमेदवारी दाखल करण्यावर ठाम आहेत. देशमुख हे माजी राज्यमंत्री असून वर्षभरापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मागील निवडणुकीत ते अपक्ष लढले असतांना काँग्रेसच्या अमित झनक यांनी त्यांचा पराभव केला होता. देशमुख यांना अद्यापपर्यंत (BJP) भाजपचा एबी फॉर्म मिळाला नसला तरी उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत उद्यापर्यंत पक्ष निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली.

तर शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झालेल्या भावना गवळी यांनी मात्र भाजपकडून येथे उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितलं आहे. ही जागा महायुतीतील शिवसेनेला सुटलेली आहे आणि मीच इथे उमेदवार आहे. त्यामुळे भाजपकडून कोणी उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. या भागातील सर्व मित्र पक्ष माझ्यासोबत आहेत. माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे; असे भावना गवळी यांनी सांगितलं. तर मैत्रीपूर्ण लढती बद्दल विचारले असता असा कुठलाही प्रकार होणार नाही. ही जागा स्पष्टपणे शिवसेनेला सुटली आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नचं येत नाही. भाजपचे नाराज नेते असतील त्यांना समजावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे करतील; असा विश्वास असल्याचं भावना गवळी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT