Washim JCB Scorpio accident Saam Tv News
महाराष्ट्र

Washim Accident : भरधाव स्कॉर्पिओचं नियंत्रण सुटलं, उभ्या JCB ला धडक, वाहनाचा चक्काचूर; एकाचा करुण अंत

Washim Scorpio and JCB Accident : स्कॉर्पिओ लोणारच्या दिशेने भरधाव वेगावे जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींना वाशिम येथील रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Prashant Patil

मनोज जैसवाल, साम टीव्ही

वाशिम : वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावर चाकोली ते मोरगव्हाण दरम्यान स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ लोणारच्या दिशेने भरधाव वेगावे जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला. अपघातातील गंभीर जखमींना वाशिम येथील रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. यातील एकजण ठार आणि दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी हे सर्व स्कॉर्पिओमधील आहेत.

बुलढाण्यात बाईक अपघातात तिघांचा करुण अंत

दरम्यान, राज्यात अपघाताचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अनेक लोकांचा यात जीव देखील जातो. असाच एक भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली ते जाफराबाद रस्त्यावरील पळसखेड दौलत गावाजवळ झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या पल्सर गाडीचा अपघात झाला असून पल्सर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. या घटनेत गाडीवरील तिघेही युवक जागीच ठार झाले असून तिघेही सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी आहेत. मृतकांमध्ये रोहित चाबुकस्वार, शुभम चाबुकस्वार आणि सोनू उसरे यांचा समावेश आहे . ही तिघेही तरुण पंचविशीतील असून कुंभारी येथे जात असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार (वय २४), शुभम रमेश चाबूकस्वार (वय २५) आणि सोनू सुपडू उसरे (वय २३) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एमएच १५. ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT