Ekburji Dam Saam tv
महाराष्ट्र

Ekburji Dam: वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Washim News वाशीम शहराला पाणी टंचाईची शक्यता; एकबुर्जी धरण ८० टक्के पाणीसाठा

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला. मात्र, वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण क्षेत्र परिसरात आणखी ही जोरदार (Rain) पाऊस न झाल्याने धरण केवळ ८० टक्केच भरले आहे. त्यामुळे पुढे पाऊस न पडल्यास (Washim) वाशिम शहराला  पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

एकबुर्जी धरण हे मातीचे धरण असून या धरणाची निर्मिती १९६५ दरम्यान करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या २५ हजार होती. आज वाशिम शहराची लोकसंख्या सव्वा लाखाच्या जवळपास आहे. सोबतच या धरणातील शेती सिंचनासाठी ५५ टक्के पाणीसाठा राखीव ठेवला जातो. हे धरण ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात १०० टक्के भरल्यानंतरही मे महिन्यात दहा ते बारा दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. 

यंदा पावसाळ्याचा अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. परंतु धारण पाणलोट क्षेत्रात हवा तसा पाऊस झाला नसल्याने धरणातील पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पाऊस न पडल्यास वाशीम शहराला पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

SCROLL FOR NEXT