Washim Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Washim Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस! ८ जणांचे लचके तोडले; तीन चिमुकल्यांसह महिला गंभीर जखमी

Washim Latest News: वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातल्याचे समोर आले आहे. कुत्र्याने शहरातील विविध भागांमध्ये आठ जणांवर हल्ला करत गंभीर जखमी केले.

Gangappa Pujari

मनोज जैस्वाल, वाशिम|ता. २२ जुलै २०२४

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून आठ जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन चिमुकल्यांसह एक महिला गंभीर जखमी झाली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातल्याचे समोर आले आहे. कुत्र्याने शहरातील विविध भागांमध्ये आठ जणांवर हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून एक ७० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

या सर्वांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व रुग्णांना दोन ॲम्बुलन्सने वाशिम येथे पुढील उपचाराकरिता पाठविले आहे. या कुत्र्याने रिसोड शहरातील महात्मा फुले नगर,अहबाब नगर, अमरदास नगर, मूल्लागल्ली येथील नागरिकांना चावा घेतला.

दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांवर हल्ला करुन जखमी केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कुत्र्याला जीवे मारले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : बीडमध्ये निवडणुकीला हिंसक वळण, दोन गटात राडा अन् दगडफेक

Signs Of Heart Failure: मानेची ही एक टेस्ट सांगेल हार्ट अटॅक येणारे; अवघ्या २० मिनिटात कळेल धोका किती?

Satellite Based Toll System: नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती; आता सॅटेलाइटद्वारे टोल वसुली होणार नाही

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन, भाजपविरोधात आक्रमक

Mumbai : मुंबईतील स्टेशनवर बेवारस बॅगेत सापडलं लाखोंचं घबाड, पैसे नेमके कुणाचे? पोलिसांना समजताच...

SCROLL FOR NEXT