Accident News Saam tv
महाराष्ट्र

Washim Accident News: देवदर्शनाला जाणारे कुटुंब थोडक्यात बचावले; भरधाव ट्रकची कारला धडक, पाच गंभीर जखमी

Washim News : देवदर्शनाला जाणारे कुटुंब थोडक्यात बचावले; भरधाव ट्रकची कारला धडक, पाच गंभीर जखमी

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : वणीच्या गडावरून शेगाव येथे दर्शनाकरिता नायगावकर कुटुंब जात होते. परंतु देवदर्शन घेण्यापूर्वीच कुटुंबाचा (Accident) अपघात झाला. भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला (Shegaon) असून यातून नायगावकर कुटुंब थोडक्यात बचावले आहे. या अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Tajya Batmya)

नायगावकर कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी जात होते. प्रवास सुरु असतांना कारंजा - दारव्हा मार्गावर बोदेगाव ते सावंगीच्या मधोमध नदीच्या पुलाजवळ भरधाव ट्रकने कार्ल धडक दिली. या अपघातात कारमधील उषा नायगावकर (वय ५५), अबोली नायगावकर (वय २३), आनंद नायगावकर (वय ३७), अशोक नायगावकर (वय ६७), राकेश गडमवार (वय ५०) हे पाचही गंभीर जखमी झाले आहेत. (Washim) तर सुदैवाने कारमधील तीन वर्षाच्या मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही. 

जखमी रुग्णालयात दाखल 
सदर अपघाताची माहिती समजल्यानंतर श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. सर्व जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे साहेब यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

आभाळ फाटलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पुरात २२ जणांचा मृत्यू, १५ जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT