Wardha Gram Panchayat Saam Tv
महाराष्ट्र

विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी; विरुळ ग्रामपंचायतीचा अनोखे उपक्रम 

विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ ग्रामपंचायतीने टॅक्स वसूल करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरवात केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरेन्द्र रामटेके

वर्धा: विदर्भातील पहिली मोफत पीठ गिरणी आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ ग्रामपंचायतीने टॅक्स वसूल करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. ५ हजार लोकसंख्या असलेल्या विरुळ (Virul) येथील कुटुंबांना मोफत दळण देण्याचा ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat) अभिनव उपक्रम सुरू केला आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येणाऱ्या विरुळ आकाजी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी विदर्भामधील पहिली "मोफत पीठगिरणी" कार्यान्वित करण्यात आली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटीमार्फत हा नाविण्यपूर्ण उपक्रम आणण्यात आला आहे.

हे देखील पहा-

या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थांच्या (villagers) कुटुंबाचा दळणखर्च वाचणार आहे. या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्यासाठी जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक विरूळ या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतींना भेट देत आहेत. ५ हजार लोकसंख्या असलेल्या विरुळ येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल, या अनुषंगाने १० हॉर्स पॉवरची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे. चक्कीला मोफत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर १० किलो वॅटचे सोलार पॅनल बसविण्यात आले आहे.

या सोलार पॅनलद्वारे प्रति महिन्याला १५०० युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करत आहे. निर्मित केलेली वीज विरुळ येथील विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय आणि विद्युत वितरण स्टेशन यांच्यामध्ये करण्यात आली आहे. त्या अनुशंगाने विद्युत स्टेशन कडून त्यांची विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करत आहे. यामुळे ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची वीजबिल आकारणी होत नाही.

तसेच, ग्रामस्थांनासुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. विरुळ ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आलेली असून, नियमित ग्रामपंचायत चे कर देणाऱ्या कुटुंबाना मोफत दळण दिले जाते तर कर थकबाकीदारांना वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे. तसेच, सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमासाठी वाजवी दरात दळण दळून दिले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुम्ही कूलर वापरताय? सावधान ! कूलरनं घेतला चिमुकल्याचा बळी

CJI Surya Kant: बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात, सरन्यायाधीश सूर्यकांत का संतापले?

NEET पेपर विक्रीचं 'ब्युटी पार्लर', पुण्यात घरपोच पेपर पुरवण्याचं रॅकेट

लग्नाची हळद जीवावर उठली, लग्नाआधीच नवरीचा गेला जीव

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक परिसरात चार तासात दुसरा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT