Wardha Youth Protest Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Protest: बेरोजगारांचं आंदोलन; पंतप्रधान आणि फडणवीसांचे पोस्टर लावत थाटले चहा, पकोड्याचे स्टॉल

Wardha Youth Protest : मागील सहा दिवसांपासून हा आंदोलन गांधी चौकात सुरू आहे. आज या आंदोलनात पकोडे, चहा आणि चिवडा विक्रीचा स्टॉल लावण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

Wardha Unemployed Protest:

बेटरप्लेस'ने जाहीर केलेल्या एका अहवालानुसार देशात बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तवलीय. तर काही दिवसांपूर्वी लेबर मार्केटनुसार कोरोनानंतर २५ वर्षाच्या आतील ४२ टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचं अहवालात म्हटलंय. मात्र सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. (Latest News)

त्यात सरकारकडून नोकरी भरती कंत्राटी पद्धतीनं करत आहे. सरकारने कंत्राटी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्यावतीनं सुशिक्षित युवकांकडून हटके धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मागील सहा दिवसांपासून हा आंदोलन गांधी चौकात सुरू आहे. आज या आंदोलनात पकोडे, चहा आणि चिवडा विक्रीचा स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी तरूणांनी बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला नावाने स्टॉल थाटले आहेत.

हे आंदोलन नीतेश कराळे सर यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. दरम्यान शासनाने कंत्राटी पद भरतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वर्ध्यात नितेश कराळे यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला युवकांनी मोर्चा काढला. त्यांनतर वर्ध्याच्या गांधी चौकात तरूणांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केलीय. गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात तरुण मौनव्रत सत्याग्रह करणार आहेत.

जेव्हापर्यंत हा शासन निर्णय सरकार परत घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं युवकांनी सांगितलं. आज या धरणे आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या अभिनव आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कटआऊट लावत त्याच्यावर उपहासत्मक टीका सुद्धा करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT