Wardha car accident Saam TV News
महाराष्ट्र

Wardha Accident : महाप्रसादासाठी गेले, परतताना होत्याचं नव्हतं, पोलीस कुटुंबाचा हृदयद्रावक अंत; उपस्थितांच्या काळजात धस्स झालं

Wardha Car Accident : महाप्रसाद कार्यक्रम आटोपून ते आपल्या एमएच ४०... ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने ते परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असताना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले.

Prashant Patil

वर्धा : एक हसरं चौकोनी कुटुंबाचा हृदयद्रावक अंत झाला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. वर्धा तालुक्यातील तरोडा काल सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. त्यात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी आणि दोन मुलं ठार झाले आहेत. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी सात वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्य हे कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश (वय ६ वर्ष) आणि मुलगी माही (वय ३ वर्ष) हे पण होते.

महाप्रसाद कार्यक्रम आटोपून आपल्या एमएच ४०... ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने ते परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असताना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी समोरून येणाऱ्या टँकरला धडकली, आणि मोठा अपघात झाला. घटनास्थळीच पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य आणि त्यांच्या मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. रात्री ११ वाजता ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. तरोडा हायवेवर हा अपघात झाला. टँकर एमएच ०९ सीव्ही २१८५ या वाहनाला अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर ही कार धडकल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे आणि काकडे हे पोहोचले होते. जखमी झालेल्यांना प्रथम सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अपघात घडल्याचं माहित होताच लगतचे गावकरी धावून आले. त्यांनी पोलीस विभागास माहिती देत रुग्णवाहिका बोलावून घेतली, त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आलं. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात वास्तव्यास होते. एकाच अपघातात सर्व कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त कारची स्थिती समोरून चेंदामेंदा झाली होती. सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचं घटनास्थळाचं चित्र आहे. या अपघातास कारण ठरलेला रानडुक्करला देखील जोरात धडक बसल्याने तेही मरण पावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT