चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात जुलै महिण्यात सरासरी पेक्षा दुप्पट पाऊस झालाय. पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अंदाज काढला असला तरी सात दिवसात पूर्ण पंचनामे होणार असल्याच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितलंय. जिल्ह्यात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील धोका टाळण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पावसाने 267 हेक्टर जमीन खरडून काढली आहे.
जुलै महिण्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाचा तूर, सोयाबीन व कापूस पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात अकरा हजार हेक्टरवर 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर 267 हेक्टर जमीन अक्षरशः खरडून निघाली आहे. या पावसामुळे 630 घरासह 15 गोठ्यांची सुद्धा पडझड झाली आहे.
यात काही अंशत तर काही घरे पूर्णपणे पडली असून एका व्यक्तीचा वीज पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात आली आहे.दोन दिवसापासून पावसाने उघड दिल्याने आता जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. येत्या सात दिवसात नुकसानीचा पूर्ण अहवाल येणार असल्याच जिल्हा प्रशासनाने सांगितलंय.
वर्धा जिल्ह्यात मागील दोन वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिण्यात सुद्धा पुरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यावर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क आहे.जिल्हाधिकारी स्वतः दररोज जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाण्याच्या विसर्ग संदर्भात डिस्चार्ज मॅनेजमेंट सोबत संपर्क करून पाणी किती सोडल्या जातं आहे.
कोणत्या गावात किती वेळेत पाणी पोहचेल याची माहिती घेऊन नदी काठच्या 280 गावांना अलर्ट दिला जात आहे. एवढंच नव्हे तर ज्या गावांना जास्त पुराचा धोका आहे. तिथे जिल्हाधिकारी यांनी स्वतः बचाव व शोध पथकांची स्थायी नियुक्ती केली आहे. यावर्षी जिल्हा प्रशासन पुरस्थिती पासून बचाव करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचही जिल्हाधिकारी यांनी सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.