The incident of an 8-year-old boy who died after being bitten by a dog in Wardha district raises saam tv
महाराष्ट्र

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

8-Year-Old Dies After Dog Bite : वर्धा येथे एका ८ वर्षाच्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. रेबीजचं इंजेक्शन घेतल्यानंतरही त्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

  • वर्ध्यात 8 वर्षीय मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू

  • मुलाने रेबीजची तीनही इंजेक्शन घेतली होती

  • उपचार असूनही मृत्यू झाल्याने खळबळ

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

कुत्र्याने चावा घेतल्याने वर्ध्यात एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे या मुलाने रेबीजचे तीन इंजेक्शन सुद्धा घेतले होते, तरीही या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालीय. कुत्रा चावल्यानंतर डॉक्टर दोन प्रकारच्या लस दिल्या जातात. पीडित व्यक्तीला तीन इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यातील पहिलं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर लगेच दिले जाते. कुत्रा चावल्यावर त्याच दिवशी पहिलं इंजेक्शन घेतलं जातं. तर दुसरं इंजेक्शन तीन दिवसांनी आणि तिसरे इंजेक्शन ७ दिवसांनी घेतलं जातं. त्यातून रेबीजपासून बचाव होत असतो.

पण वर्ध्यात मात्र विचित्र घटना घडली, रेबीजचं इंजेक्शन घेऊनही आर्वी येथील ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या मृत मुलाचे नाव धवल आहे. धवलला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर त्याला रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले, त्याने त्याचे तीन इंजेक्शन घेतले. परंतु त्याला हायड्रोफोबीयाचा त्रास जाणवत होता. यामुळे त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याला अॅक्युट रेबीज सिंड्रोमच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १५ तारखेला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, धवल नावाचा आठ वर्षाचा मुलगा आमच्याकडे १५ तारखेला दाखल करण्यात आला. त्याची हायड्रोफोबीयाची हिस्ट्री होती.साधारणपणे डॉग बाईट झालेल्यांना रेबीज झालेल्यांनाच अशी हिस्टरी असते. २५ तारखेला त्याला कुत्रा चावल्याची हिस्टरी त्याच्या नातेवाईकांनी सांगितली.

१५ तारखेला त्याला नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ तारखेला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याने तीन इंजेक्शन पण त्याने तिथे घेतलेले आहे. आमच्याकडे अॅक्युट रेबीज सिंड्रोम म्हणून तो दाखल झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

रेबीज हा जीवघेणा आजार आहे. कुत्रा चावल्यानं रेबीज होतो. रेबीज हा न्यूरोट्रॉपिक लिसावायरस किंवा रॅबडोविरिडे नावाच्या विषाणूमुळे संसर्ग होत असतो. रेबीजवर कायमस्वरूपी उपचार नाहीत. मात्र वेळीच निदान झाल्यास हा आजार आटोक्यात ठेवता येतो. लसीकरणाच्या मदतीनं रेबीजवर नियंत्रण मिळवता येते. पण जर एखाद्या व्यक्तीला लस मिळाली नसेल तर रेबीजचा संसर्ग पसरू शकतो आणि हा संसर्ग हळूहळू जीवघेणा ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT