Wardha News
Wardha News Saam tv
महाराष्ट्र

वर्धेतून कोणाला मिळणार मंत्रिपदाची संधी; जिल्ह्यातील आमदारांकडून मंत्रिपदासाठी लॉबीग सुरु

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : राज्यात शिंदे– फडणवीस सरकार आल्यानंतर वर्धेत कोणाला मंत्रिपद मिळणार? याबाबत उत्सुकता लागली आहे. वर्ध्यात (wardha) भाजपचे खासदार, तीन विधानसभेचे आमदार, एक विधान परिषद आमदार आहेत. जिल्‍ह्यात जिल्हा परिषद, बहुतांश नगरपालिका, पंचायत समिती भाजपच्या (BJP) ताब्यात आहेत. त्यामुळे वर्धेत मंत्रीपद मिळावं अशी मागणी केली जातेय. सध्यातरी विधान परिषद आमदार रामदास आंबटकर, आर्वीचे आमदार दादाराव केचे किंवा वर्धेचे आमदार पंकज भोयर यांची नाव चर्चेत आहे. पुढील विस्तारात जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Wardha Political News)

सरकार बदलले असून शिंदे– फडणविस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्धा जिल्ह्यास संधी मिळणार काय? वर्ध्यात शिंदे गटाचा कुणीही आमदार नसल्याने त्यांच्या दाव्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यात भाजपचे विधान परिषद आमदार रामदास आंबटकर, आर्वीचे आमदार दादाराव केचे, वर्ध्याचे आमदार पंकज भोयर, हिंगणघाटचे समीर कुणावार अशी चार आमदार आहे. यात भाजपच्या बांधणीसाठी काम करणारे विधान परिषद आमदार रामदास आंबटकर, काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडून पहिल्यांदा जिल्ह्यात कमळ फुलविणारे आर्वी मतदार संघांचे आमदार दादाराव केचे आणी वर्धा विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले युवा आमदार पंकज भोयर ही नाव मंत्रिपदासाठी अग्रक्रमावर आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत भाजपचा एकही स्थानिक नेता पालकमंत्री बनला नाही. या चौघापैकी कुणालाही एकाला मंत्रिपद द्यावं, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केलीय.

भाजपकडून वर्धा जिल्‍ह्यात सर्वात पहिले आमदार म्हणून आर्वीचे आमदार दादाराव केचे निवडूण आलेय. केचे ज्येष्ठ आमदार आहेत. केचे यांना अनेक निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला तरीसुद्धा त्यांनी भाजपशी एकनिष्ठ राहून संघटन आपल्या मतदार संघात वाढविले. एकूण समीकरण बघता आमदार केचे, रामदास आंबटकर आणी डॉ. पंकज भोयर यांची कार्यशैली, विकास कामांसाठी असलेली धडपड आणी युवा चेहरा पाहता यांचे पारड जड मानले जात आहे. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT