Wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime : पाचवीतील मुलीचा विनयभंग; युवकास तीन वर्ष जेल

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आईचीही साक्ष महत्वाची ठरली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

Wardha Crime News : अल्पवयीन मुलीला लग्नाचा तगादा लावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी गजानन सयाम याला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 3 हजार रुपये दंड तसेच ३ हजार रुपये पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांनी दिला.

पीडिता पाचव्या वर्गात शिक्षण घेत असताना १ जानेवारी २०१२ रोजी तिचे वडील शेतात कामासाठी गेले होते. आई बँकेत गेली होती. पीडिता ही घरी एकटीच होती. दुपारच्या सुमारास आरोपी गजाननने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझा मोबाइल नंबर दे, आपण दोघे लग्न करू' असा तगादा लावत होता. तेवढ्यात पीडितेची आई आली.

पीडिता व तिची आई हे आरोपीच्या घरी गेले असता आरोपीच्या आईने माझा मुलगा तसा नाही असे म्हणाली. त्यावेळी आरोपी हा त्याच्या घरातच हजर होता परंतु तो घराच्या बाहेर आला नाही. याबाबतची तक्रार पीडितेने कारंजा पोलिसात (Police) दिली.

प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी यांनी केला. आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहून यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी फौजदार अशोक सोनटक्के यांनी साक्षीदारांना हजर करून मोलाची कामगिरी बजावली. शासनातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आईचीही साक्ष महत्वाची ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

SCROLL FOR NEXT