saam Tv Saam TV
महाराष्ट्र

Wardha News : देशात 2024ला पंंतप्रधान म्हणून कोण येणार? महिलेचं उत्तर ऐकून चंद्रशेखर बावनकुळेंनी माईकच खाली घेतला

Chandrashekhar Bavankule News : वर्ध्यात भाजपकडून संकल्प ते समर्थन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News :

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. विविध ठिकाणी जात ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. बावनकुळे या अभियानाअंतर्गत वर्धात पोहोचले होते. तिथे त्यांची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

वर्ध्यात भाजपकडून संकल्प ते समर्थन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या वर्दळीच्या परिसरातील असलेल्या साई मंदिर ते अंबिका चौकपर्यंत यात्रेदरम्यान एका महिलेला 2024 मध्ये कोण देशाचे पंतप्रधान पाहिजे असे विचारले? यावेळी वर्ध्यातील महिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार विजेचे बिल वाढवून देते, सिलिंडर वाढवून देता, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने विचारला. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माईक बाजूला करत महिलेचं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न केला. (Wardha News)

तुम्ही स्टेजवर चला,आपण स्टेजवर बोलू अशी विनंती त्या महिलेला बावनकुळे यांनी केली. त्यावर महिला आणखी संतापली आणि स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? अशीच चर्चा यावेळी महिलांमध्ये रंगली होती.

मंगळवारी वर्ध्यातील मुख्य बाजारपेठेत भाजपाचे हे अभियान होते. या अभियानात बावनकुळे स्वतः नागरिकांच्या भावना जाणून घेत होते. पण एका सर्वासामान्य महिलेने बावनकुळे यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त केल्याने हा विषय सगळीकडे चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT