चेतन व्यास
वर्धा : नऊ वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीतील वर्धा जिल्हा सहकारी बँकेकडे पडून असलेल्या ७८ लाख ६४ हजार रुपयांची रक्कमेचे कागदी तुकड्यांचा ढीग एवढेच महत्व उरले आहे. तर संपूर्ण राज्यातील आठ सहकारी बँकेचे तब्बल १०१ कोटीची रक्कम असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मागील नऊ वर्षे या नोटा बँकेच्या हिशेबी केवळ शिल्लक रक्कम असे स्वरुप उरले आहे.
काळा पैसा चलनातून कायमचा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. वर्धा जिल्हा सहकारी बँकेने नोटबंदीच्या एक दिवसापूर्वीच वर्धेच्या भारतीय स्टेट बँकेतून एक कोटी रुपयाची रक्कम विड्रॉल केली होती. रक्कम विड्रॉल केल्याच्या एका दिवसानंतरच नोटबंदी झाली.
व्याजाचा भुर्दड बँकांना
नोटबंदी होताच वर्धा सहकारी बँकेने स्टेट बँकेत पैसे परत करण्यासाठी गेले. मात्र बँकेने दोन दिवस थांबण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सहकारी बँकेने आपल्या नागपूर शाखेशी सुद्धा संपर्क केला. त्यांनी सुद्धा थांबण्याचा सल्ला दिला. गतवर्षीपर्यंत या नोटा बँकांकडे पडून असल्याने त्याचा व्याजाचा भुर्दड बँकांना बसला. आता नफ्यातून त्याची तरतूद केल्याने या नोटा थोडक्यात शून्य किमतीच्या 'नॉन परफॉर्मिंग असेट' ठरल्या आहेत. त्यांची जपणूक करणे याचाच बँकांना भुर्दड बसतो आहे.
नोटांबाबत नाबार्डच्या टीमनेही तपासणी
याच दरम्यान शासनाने पत्र काढत सहकारी बँकेतील कोणतीही रक्कम न घेण्याचे आदेश काढले. यामुळे ही रक्कम अद्यापही बँकेतच पडून आहे. अश्याच प्रकारे राज्यातील आठ सहकारी बँकेची परिस्थिती असून या बँकांची १०१ कोटीच्या रक्कमची किमत शून्य झाली आहे. वर्धा सहकारी बँकेत असलेल्या नोटांबाबत नाबार्डच्या टीमनेही तपासणी केली. यातही वर्धा जिल्हा सहकारी बँकेत असलेली नोटा बँकेतून विड्रॉल केल्याचं समोर आलं आहे. अद्याप याबाबत निर्णय न झाल्याने बँका संकटात सापडल्या आहे.
नोटा जपून ठेवणे बंधनकारक
वर्धा सहकारी बँकेत ५०० च्या २०२ नोटा तर एक हजार रुपयांच्या ७७६० जुन्या नोटा तिजोरीत अद्यापही पडून असून या रकमेची किंमत आजघडीला शून्य आहे. जिल्हा बँकेकडे ७८ लाख ६४ हजार रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत. या शिल्लक नोटांना 'एसबीएन (स्पेसिफाईड बँक नोट्स) असे म्हणतात. नोटबंदीनंतर पाचशे आणि हजारांच्या नोटांचा उल्लेख असा केला जातो. थोडक्यात या नोटा आहेत, मात्र त्यांची किंमत शुन्य आहे. या नोटा शून्य किमतीच्या असल्या तरी जपून ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे.
कोणत्या बँकेचे किती जुन्या नोटा आहे पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून
जिल्हा बँक निहाय शिल्लक रक्कम (कोटीत)
वर्धा ---- ०.७८
नागपूर ---- ५.०२
अमरावती ---- ०.११
पुणे ----- २२.२५
कोल्हापूर ---- २५.२७
सांगली ---- १४.७२
नाशिक ---- २१.३२
अहिल्यानगर -- ११.६८
एकूण----- १०१ कोटी १८ लाख
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.