wardha accident news
wardha accident news  saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्ध्यात भरधाव कंटेनरची इलेक्ट्रीक दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, संजय राठोड

Wardha News : वर्ध्यात भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा (Wardha) जिल्ह्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड (२७), प्रितम जगदीश टेभुंळकर (२५) दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.

मृतक धनराज आणि प्रितम हे दोघे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात होते. त्यावेळी खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी अपघातस्थळी जात कंटेनर चालकास अटक केली. अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी जाम महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.

यवतमाळमध्ये कार दरीत कोसळली; तीन गंभीर जखमी

यवतमाळच्या राळेगाव ते वडकी रस्त्यावर सावंगी पेरका या गावाजवळील वळणावर एक चार चाकी सात फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सावंगी या गावाजवळील असलेल्या वळणावर ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

सावंगी या गावाजवळील असलेले वळण अत्यंत धोकादायक असून समोरील येणारे वाहन हे दिसून पडत नाही. तसेच या वळणावर कोणतेही दिशाफलक सुद्धा लावण्यात आलेले नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन प्रवाशी प्रवास करीत होते. तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Mother's Day 2024 : एक दिवस फक्त आईसाठी; 'मदर्स डे' ला तुमच्या माऊलीला द्या हे सुंदर सरप्राईझ

Today's Marathi News Live : भाज्यांचे दर कडाडले, किलोमागे तब्बल ८० रुपयांपर्यंत वाढ; अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा फटका

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

SCROLL FOR NEXT