Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: येरणवाडी- शिरूर शिवारात वाघाच्या पायाचे ठसे; वनविभागाकडून परिसराची पाहणी

Wardha News : येरणवाडी- शिरूर शिवारात वाघाच्या पायाचे ठसे; वनविभागाकडून परिसराची पाहणी

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : जिल्ह्यातील येरणवाडी- शिरूर शिवारात आज वाघाच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. यामुळे परिसरातील (Wardha) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वन विभागाच्या (Forest Department) पथकाने परिसरात पाहणी केली आहे. (Breaking Marathi News

वर्धा जिल्ह्यातील भागात मागील गेल्या दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने शेत शिवारातील कामे प्रभावित झाली आहे. अशातच आज सकाळी येरणवाडी- शिरूर शिवारामध्ये (Tiger) वाघाच्या पायाचे ठसे दिसून आल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगणघाट तालुक्याच्या अल्लीपूरलगतच्या येरणवाडी- शिरूर शिवारामध्ये वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसली. 

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण 

वाघाच्या पायाचे ठसे असल्याचे समजल्याने आता शेतात जायचे कसे? जनावरेही चारायला सोडायची कशी? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. माहिती मिळताच वन विभागाच्या वनपाल सयाम व वनरक्षक शिवाजी राठोड यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाघाच्या पायाच्या ठशांची पाहणी केली. तसेच हिंगणघाट मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी दक्षता घ्यावी. आसपासच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटून गेला, लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० कधी येणार?

SCROLL FOR NEXT