Traffic Police Saam tv
महाराष्ट्र

स्वत:च्या मोबाईलमधून फोटो काढला तर आता पोलिसांवरच होणार कारवाई

स्वत:च्या मोबाईलमधून फोटो काढला तर आता पोलिसांवरच होणार कारवाई

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. ई- चलान दिली जाते. मात्र, अनेकदा ई- चलान देताना पोलीस कर्मचारी वैयक्तिक मोबाईलमध्ये वाहनांचे फोटो घेतात. हे उल्लंघन यापुढे खपवून घेतल्या जाणार नाही. वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो काढल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे फोटो वैयक्तिक मोबाईलमध्ये काढल्यास आता थेट संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवरच दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिला आहे. यामुळे आता वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणार असून अवैध वसुली करणाऱ्यांवरही चाप बसणार आहे. (Wardha News Traffic Rules)

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जाते. कारवाई करताना ई-चलान मशीनच्या सहाय्यानेच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्या मोबाइलमध्ये फोटो काढले जात होते. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याची दखल घेत पोलीस महासंचालकांनी पत्र काढत अश्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे.

वाहतुक पोलिसांपुढे प्रश्‍न

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे मशीनमध्ये फोटो काढून ई-चलान दिली जाते. मात्र, अनेकदा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड येतो. तसेच संबंधित वाहनाचे लोकेशन दुसरे दाखवित असल्याने अनेकदा वैयक्तिक मोबाईलमध्ये फोटो काढावे लागतात. त्यामुळे मोठ्या अडचणी येतात. यामुळे अशी अडचण आल्यास वाहन चालकाला सोडून द्यावे का? असा प्रश्न आता वाहतूक पोलिसांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT