काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसतील; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

काही बडे नेते रात्रीतून भाजपमध्‍ये दिसतील; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSaam tv
Published On

नंदुरबार : नंदूरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका यांच्यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भाजप व शिंदे गट एकत्र लढतील. राज्यातल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था शिंदेगट आणि भाजप (BJP) एकत्रीत लढणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट करत राज्यातील सरकार जसे रात्रीतुन बदलले तसेच काही बडे नेते रात्रीतुन भाजपत दिसतील; असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला. (Nandurbar Chandrashekhar Bawankule News)

Chandrashekhar Bawankule
Girna Dam: सलग चौथ्‍या वर्षी गिरणा धरण शंभर टक्के भरण्याच्‍या मार्गावर; परतीच्या पावसाचा परिणाम

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जेष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे आज दि.१३ रोजी नंदुरबार (Nandurbar) जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी नंदूरबार येथील विजयपर्व येथे पत्रकार परिषदेत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), युवा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आ.राजेश पाडवी, शशिकांत वाणी आदी उपस्थित होते.

सत्‍ता गेल्‍याने विरोधी बावचळले

सध्याचे शिंदे– फडवणीस सरकारची बुलेट ट्रेन असुन जुन्या सरकारची तीन चाकी रिक्षा होती. त्यामुळे विकासाच्या कामात निश्चितच फरक दिसेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातले विरोधी पक्षाचे नेते सत्ता गेल्याने बावचळले असुन त्यांनी त्याच्या कार्यकाळात काहीच केले नसल्याने त्यांच्या आरोपांची दखल का घ्यावी? त्यांचे आरोप हे फक्त प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप देखील बावनकुळेंनी केला आहे. याकुब मेननच्या कबरीचे सुशोभिकरण हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या काळातच झाल्याने त्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी देखील आज बावनकुळेंनी केली.

भाजप– शिंदे गट एकत्र निवडणुका लढतील

नंदूरबार पालिकेसह जिल्ह्यातील सर्व पालिका स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका नंदूरबार जिल्ह्यातील भाजप व शिंदे गटात गेलेले नेते यांच्याशी चर्चा करून समन्वयाने याबाबत निर्णय घेण्यात येईल. आपापसात असणारे मतभेद मिटवून एकत्र निवडणुका लढविण्यात येईल; असे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्षांच्‍या या विधानामुळे आता नंदूरबार पालिका बिनविरोध होणार की तिसरी आघाडी निर्माण होणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com