Dhirendra Shastri Saamtv
महाराष्ट्र

Dhirendra Shastri News: बागेश्वर महाराजांच्या प्रवचनावर बंदी घालत अटक करा; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण पेटलं

Bageshwar Maharaj: वर्ध्यात विविध सामजिक संघटनांच्या वतीने बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचा निषेध नोंदविण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Dhirendra Maharaj Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराजानी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. वर्ध्यात विविध सामजिक संघटनांच्या वतीने बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचा निषेध नोंदविण्यात आला आहे. (Latest Marathi News)

वर्ध्यात छत्रपती शिवाज महाराज चौकात जगतगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे कडून हा आंदोलन करण्यात आलं. यावेळी बागेश्वर महाराजांच्या प्रवचनावर बंदी घालत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बागेश्वर महाराजांच्या फोटोला जोडेही मारण्यात आले.

वर्ध्यातील (Wardha) शिवाजी चौकात जगतगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्वच एकत्र येत बागेश्वर धामच्या महाराजविरोधात आंदोलनात सहभाग नोंदवला.

सरकारनेही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या महाराजांविरोधात कारवाई करावी. महाराजाच्या प्रवचनावर बंदी घालत अटक करावी. सोबतच महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात कडक कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

देहू संस्थानकडून निषेध

"तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या त्यामुळे चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या," अशा शब्दात देहू (Dehu) संस्थानकडून बागेश्वर बाबांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा?

संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना बागेश्वर बाबाने "त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले," असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT