Unconscious Patient Found Covered in Ants 
महाराष्ट्र

Wardha News: धक्कादायक! बेशुद्ध रुग्णाच्या अंगावर चढल्या मुंग्या,हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

Unconscious Patient Found Covered in Ants : हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडलाय. रुग्णालयातील रुग्णाच्या अंगावर मुंग्या चढल्याच्या प्रकार समोर आलाय.

Bharat Jadhav

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

एकीकडे आरोग्य सुविधेच्या बाबतीत राज्य आरोग्य विभाग आपली प्रचार प्रसार करून आपली पाठ थोपटत आहे. दुसरीकडे कुठे डॉक्टरांचा अभाव, रुग्णाची गैरसोय असे प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तर चक्क बेशुद्ध रुग्णाच्या अंगावर मुंग्याचं चढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

शस्त्रक्रिया गृहातून बाहेर आणलेल्या रुग्णाला आंतररुग्ण वॉर्डात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्ण शुद्धीवर नव्हता. या रुग्णाच्या शरीरावर काहीच वेळात मोठ्या प्रमाणात मुंग्या चढल्या. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात घडलेला हा प्रकार रुग्णालयाच्या स्वच्छतेचा बोजवारा सांगणारा आहे. हिंगणघाट लगतच्या चिचघाट (लाडकी) येथील रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला पुरुष आंतररुग्ण वॉर्डामध्ये दाखल करण्यात आले. तेथे काही वेळातच त्याच्या सर्वांगावर मुंग्या चढल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्या सोबतच्या मित्राने याची माहिती वॉर्डमधील उपस्थित कर्मचाऱ्यास दिली. माहिती मिळताच रुग्णाला शस्त्रक्रिया कक्षात नेऊन पुन्हा तपासणी करण्यात आली आणि मुंग्या काढून टाकल्यानंतर रुग्णाची स्वच्छता करण्यात आली.

नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे शरीरावर मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रकोप झाल्याच्या घटनेने रुग्णालयाच्या स्वच्छतेवर तसेच रुग्णांच्या काळजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मुंग्यांचा प्रादुर्भाव झाला असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात मुंग्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. याची माहिती पालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली असून त्यांना येथे पेस्ट कन्ट्रोल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय संबंधित घटनेची चौकशी करण्यात येईल. तपासात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई सुध्दा करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया प्रभारी अधीक्षक डॉ. राहुल भोयर यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raid : ईडीची सर्वात मोठी कारवाई; ३५०० कोटींच्या १६० मालमत्ता जप्त, नेमकं काय आहे प्रकरण?

Rice Papad Recipe: पांढरे शुभ्र, खुसखुशीत तांदळाचे पापड कसे बनवायचे?

Pune Politics: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, ऐन निवडणुकीच्या काळात पुण्यात मोठी घडामोड

Maharashtra Live News Update: केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत होणार मोठा खुलासा; सुमनने करणार महिपत-नागराजची पोलखोल, पण…

SCROLL FOR NEXT