Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : खवल्या मांजरची दोन कोटीत डील; वन विभागाने तस्करी रोखली, सहा तस्करांना पुलगावातून अटक

Wardha News : अमरावती येथून कारने काही लोक खवल्या मांजर घेऊन येत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क करुन मदत मागितली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: खवल्या मांजरच्या खरेदी विक्रीची डिलींग दोन कोटीत निश्चित झाली होती. मात्र, वन विभागाचे पथक आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने सदरची डिलींग उधळून लावली. वन विभागासह पोलिसांनी पुलगाव येथील काॅटन मिल मॉलच्या परिसरातून कारसहीत सहा तस्करांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून खवल्या मांजर जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमरावती येथून कारने काही लोक खवल्या मांजर घेऊन येत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क करुन पोलिस मदत मागितली. पोलिसांच्या मदतीने वनविभागाच्या टिमने सहा तस्करांना खवल्या मांजरीसह ताब्यात घेतले. नफीर उल रहमान (रा. अमरावती), पसराज फेतराज पवार (रा. आगरगाव), मोहम्मद अनिस (रा. अमरावती), गुरुबचनसिंग बावरी (रा. पुलगाव), संकेत चौहान (रा. आगारगाव), अहमद खा असरफ खा (रा. अकोली ) अशी अटक केलेल्या आरोपीची नाव आहे.

पोलिसांना दिला चकमा 

पुलगाव कॉटन मील मॉल परिसरात खवल्या मांजर घेऊन आरोपी येत होते. पोलिस तांत्रिक तपास करीत होते. मात्र, आरोपींनी चार ते पाच वेळा त्यांचे लोकेशन बदलवून पोलिसांना चकमा दिला. अखेर आरोपींना मॉलच्या परिसरात कारसह अटक करण्यात आली. आरोपींनी कार भाड्याने घेतली होती. त्यामुळे कार चालकाने नेमका प्रकार काय, याची किंचीतही माहिती नव्हती. मात्र, चालक त्यांच्या साेबत असल्याने वनविभागाच्या टिमने कार चालकालाही ताब्यात घेतले.

सहा जणांवर गुन्हा दाखल 

पोलिसांच्या मदतीने सहाही तस्करांना पकडल्यानंतर वर्ध्याहून पुलगाव गेलेल्या वन विभागाच्या टिमला तस्करांना स्वाधीन केले. वन अधिकाऱ्यांच्या टिमने सहाही आरोपींना सोबत घेत वर्ध्यातील वनविभागाच्या कार्यालयात जाण्यासाठी रवाना झाले.प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT