Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha: महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मदतीची मागणी

महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मदतीची मागणी

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : नागपूर– अमरावती (Amaravati) महामार्गवर कारंजा (घाडगे) जवळ हेटीकुंडी फाट्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. दोन तास झालेल्या या आंदोलनात अमरावती नागपूर (Nagpur) महामार्ग रोखून धरल्यान वाहनांच्य लांबलचक रांगा लागल्या होत्या. (Wardha Today News)

कारंजा (घाडगे) तालुक्यात (Wardha) जंगल भागाला लागून असलेल्या काही गावांत काळजीचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांमूळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना (farmer) सौर कुंपण द्यावे, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा; आदी मागण्या यावेळी केल्या. जवळपास दोन तास रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात मोठ्या संख्येन शेतकरी, नागरिकांनी सहभाग नोंदवला.

त्‍या कुटूंबियांना ५० लाखाची मदत द्या

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रूपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्यास नोकरीत सामावून घ्याव, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT