Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : मनरेगा अंतर्गत विहिरीचे पैसे थकले; संतप्त शेतकऱ्यांचे विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील पडेगाव येथे प्रहार संघटनेच्या वतीने विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी तात्काळ थकीत असलेले विहिरीचे अनुदान देण्याची मागणी केली आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरीचे अनुदान सरकारकडून थकले आहे. थकलेल्या अनुदानमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही काहीच न झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी संतप्त होत प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पडेगावात चक्क विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनमुळे प्रशासन हादरले असून आंदोलन मागे घेण्याची विनंती अधिकाऱ्यांकडून केली जातं आहे.

मनरेगा अंतर्गत विहिरीचे बांधकाम करतांना शेतकऱ्यांनी आपल्या जवळील रक्कम वापरली. तर काहीनी पत्नीचे दागिने गहाण ठेऊन काम केली. मात्र विहिरीसाठी मंजूर असलेली रक्कम सरकारकडून देण्याबाबत वारंवार आश्वासन दिले जातं आहे. परंतु पैसे मिळाले नसल्याने अखेर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. एकीकडे विहिरीचे पैसे थकले आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामाची शेतकऱ्याला तयारी करायची आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

अखेर उपसले आंदोलनाचे हत्यार 
वर्धा जिल्ह्यातील पडेगाव येथे प्रहार संघटनेच्या वतीने विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी तात्काळ थकीत असलेले विहिरीचे अनुदान देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार प्रशासनाला निवेदन देत पैसे देण्याची मागणी करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून कोणतेच पाऊल उचलले न गेल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. 

प्रशासनात खळबळ 

दरम्यान शेतकऱ्यांनी विहिरीत उतरून सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची माहिती मिळताच वर्धा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलन थांबाविण्याची विनंती केली. मात्र आंदोलकांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्ष शाखा पडेगाव प्रमुख मंगेश मुडे, उपाध्यक्ष अमोल बोरकर, सचिव धीरज कामडी, आर्वी विधानसभा प्रमुख राजेश सावरकर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Offer: जिओ यूजर्ससाठी खास ऑफर, २% जिओ गोल्ड, अमलिमिटेड 5G डेटा अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

SCROLL FOR NEXT