Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : मुंबईहुन एमडी ड्रग्स पुरवठा; तस्करीसाठी दोन महिन्याच्या बालकाचा वापर, वर्ध्यात मोठी कारवाई

Wardha News : मुंबईतून आलेल्या दोन्ही महिला सोबत दोन महिन्याचा लहान मुलगादेखील होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बालकाच्या आड एमडी तस्करीचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : वर्ध्यात एमडी तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. अशातच पोलिसांकडून मुंबईच्या दोन महिलांसह वर्ध्यातील तिघांना तब्बल १६ लाख रुपयांचे ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मुंबईतील दोन महिलांसह वर्ध्यातील तिघे अशा एकूण पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीना न्यायालयात हजर केले असता ११ ऑगस्टपर्यंत पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

वर्धेच्या आनंदनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली असून यात मुन्ना ऊर्फ राजन थूल आणि विशाल थूल (रा. आनंदनगर) याच्या घरावर पोलिसांच्या विशेष पथकाकडून मागील दोन महिन्यांपासून नजर ठेवली जात होती. पथकाकडून विशाल आणि राजन थूलबाबत संपूर्ण माहिती काढण्यात आली असता त्याच्या घरी मुंबई येथील काही महिला एमडी विक्रीसाठी आणत असल्याचे समजले होते. त्यावरून दोन महिला विशाल थूलच्या घरी मोठ्या प्रमाणात एमडी घेऊन आल्याचे समजले. 

ऑनलाईन पेमेंट करून मागविले ड्रग्स 

यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून विशाल थूल याच्या घरी त्याची पत्नी आरती थूल तसेच मुंबईहून आलेल्या आफरीन सलीम शेख व हुमेरा रमजान शेख यांच्या ताब्यातून ३०० ग्रॅम एमडी अमली पदार्थ, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, तीन मोबाइल जप्त केले. तर पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान विशालची पत्नी आरतीने एमडी पदार्थ खरेदीसाठी आरोपी आफरीनला ऑनलाइन पेमेंट पाठविल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तिलाही आरोपी बनविण्यात आले असून, अटक करण्यात आली. 

घरफोडीच्या गुन्ह्यातून ड्रग्सची उकल 

पोलिसांनी विशालला हिसका दाखवला असता विशालने काही एमडी ड्रग व एक पिस्टल त्याचा नोकर प्रदीप मिसाळ (रा. नागसेन नगर) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी दुसरे पथक प्रदीपच्या घरी पाठवत छापा मारून त्याच्याकडून १०० ग्रॅम एमडी ड्रग आणि एक अग्निशस्त्र (पिस्टल), १ मोबाइल जप्त केला. जून महिन्यात वर्ध्यातील दोन तरुणांसह एक अल्पवयीन मुलगा जिल्ह्यातील १३ घरफोडींच्या गुन्ह्यात निष्पन्न झाले होते. त्यांच्याकडून गुन्हे उघडकीस केल्यानंतर तपासादरम्यान त्यांना एमडीचे व्यसन असून, व्यसन पूर्ण करण्यासाठी ते चोरी व घरफोडी करीत असल्याचे सांगितले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री म्हणाले जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, ठाकरेंच्या खासदाराकडून सडेतोड उत्तर

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

India National Food: भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? ९९% लोकांना माहित नसेल

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

SCROLL FOR NEXT