चेतन व्यास
वर्धा : वर्धा जिल्ह्यात महवितरण केल्या गेलेल्या वीजचोरीच्या कारवाईत ९८ ग्राहकांकडून ४३ लाखांची वीजचोरी उघड झाली आहे. यात १३ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. महवितरणच्या (Mahavitaran) भरारी पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यांतील ही कारवाई झाली आहे.
महावितरणच्या भरारी पथकांमार्फत वर्धा (Wardha) जिल्ह्यात वीजचोरी करणाऱ्या वीज ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत ५५३ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ९८ ग्राहकांकडे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले.
43 लाखाचा दंड
विज चोरी केलेल्या ग्राह्काकडून तब्बल ४३ लाख रुपयांची वीज चोरीचे प्रकरण उघडकीस आणले. इतकेच नव्हे तर दंड न भरणाऱ्या १३ ग्राहकांविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत ‘एफआयआर’ नाेंदविण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.