Wardha Cylinder Blast Chetan Vyas
महाराष्ट्र

Wardha News : मुलाच्या बर्थडेच्या दिवशीच घरात सिलेंडरचा भीषण स्फोट; भयंकर घटनेचा VIDEO समोर

घरात स्वयंपाक बनवण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागली.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टिव्ही

Wardha Cylinder Blast : घरात लहान मुलाचा वाढदिवस, सगळीकडे धामधूम सुरू होती. वाढदिवसाठी पाहुण्यांना निमंत्रण देखील देण्यात आलं. अशातच, घरात स्वयंपाक बनवण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस सिलेंडरला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन ते चार जखमी झाले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील (Wardha News) समुद्रपूर तालुक्यात ही भयंकर घटना घडली आहे. तालुक्यातील परंडा गावातील रहिवाशी गजानन देवराव तडस यांच्या मुलाचा बुधवारी (21 डिसेंबर) वाढदिवस होता. घरात वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू होती. अशातच स्वयंपाक सुरू असताना, गॅस सिलेंडरला अचानक आग लागली. बघता-बघता या आगीने रौद्ररुप धारण केलं.

दरम्यान, आग विझवण्यासाठी परिसरातील शंकर ग्यानेश्वर चंदनखेडे, कुणाल शंकर चंदनखेडे, शंकर बालाजी पाल हे तिघे धावले. मात्र, आग विझवण्याआधीच सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की घराच्या स्लॅपला अक्षरश: भेगा पडल्या.

या भयंकर घटनेत दोन्ही शंकर हे 45% भाजले तर कुणाल हा 18% भाजला. तिघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आग लागल्याने धान्य, व स्वयंपाक करिता आणलेले धान्य व इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girls Like Married Men: मुलींना लग्न झालेले पुरूष का आवडतात?

Pune News : पुण्यात विजयासाठी महायुतीची रणनीती ठरली; मित्र पक्षाला एकत्र घेत बांधली समन्वयाची मोट

IPL 2025 Auction: कोण मालामाल होणार! पंत, राहुल ते अय्यर; भारताच्या 'या' खेळाडूंची बेस प्राईज सर्वाधिक

Maharashtra News Live Updates : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना अश्रू अनावर

Nevasa Vidhan Sabha : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची भाजपमधून हकालपट्टी; बंडखोरी करत भरलेला अर्ज कायम ठेवल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT