Rain Update Saam tv
महाराष्ट्र

Rain Update : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; बोरी नदीवरील पुलावरून पाणी, धाम प्रकल्प ओव्हरफ्लो

Wardha Dharashiv News : तीन- चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज सकाळी देखील अनेक भागात जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास/ बालाजी सुरवसे 

वर्धा/ धाराशिव : राज्यात मागील चार- पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून तुळजापूरच्या बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून वाहनधारक जीवघेणा प्रवास करत आहेत. तर वर्धेतील महाकाली येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. 

वर्धेतील महाकाळी येथील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो
वर्धा : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धाम प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा शहरासह आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणारा महाकाळी येथील धाम प्रकल्प शंभर टक्के भरला असून धरणातील पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे वर्धा शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या प्रकल्पाची दोन मिटरने उंची वाढवित ३४ स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहे. सध्या या दरवाज्यामधून पाण्याचा नदीत विसर्ग सुरु आहे. 

बोरी नदीवरील पुलावरून पाणी
धाराशिव : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गेली दोन- चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातुन गावातील शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मुलांना कडेवर घेऊन पाण्यातून शाळेत पोहोचवावं लागत असल्याची परिस्थिती ठिकाणी पाहायला मिळत आहे. बोरी नदीवरील या पुलाचे काम व्हावे; यासाठी गावकरी पाच ते सहा वर्षांपासून मागणी करत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

शहापूरमध्ये अनेक दुकानात शिरले पावसाचे पाणी
शहापूर : शहापूर शहरात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे नजराणा कंपाऊंड येथील परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी असून पाण्याचा जोर कायम राहिल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. पालिका आपत्कालीन टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

Miss Universe India 2025 : राजस्थानच्या सुंदरीने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा किताब, पाहा PHOTOS

SCROLL FOR NEXT