Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: घराचे स्वप्न भंगले; महिला कर्मचाऱ्यास २६ लाखांनी गंडविले

घराचे स्वप्न भंगले; महिला कर्मचाऱ्यास २६ लाखांनी गंडविले

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : नवीन घर खरेदी करण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करुन महावितरण कंपनीत कार्यरत महिलेचा आरोपी दलालाने विश्वासघात केला. या दरम्‍यान तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांनी महिलेला गंडविले. यामुळे महिला कर्मचाऱ्याचे घराचे स्वप्न भंगले असून त्यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी (Police) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. (Tajya Batmya)

सुरेखा कृष्णा गजभे (वय ४४, रा. उगले लेआऊट सेवाग्राम) या महावितरण (Mahavitaran) सेलू विभागात नोकरी करतात. मे २०२० मध्ये त्या नोकरीवर असताना सुनिल रामचंद्र शेंडे हा आला. त्याने मी तुमच्या पतीचा मित्र आहे. आम्ही सोबत काम केले आहे. माझ्या लहान भावाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो; असे सांगून विश्वास दर्शविला. दोघांचीही ओळख झाली.

घराचे बांधकामही दाखविले

१० एप्रिल २०२१ मध्ये सुनिल शेंडे हा सुरेखाच्या घरी गेला आणि घर खरेदी करायचे आहे का? असे सांगून तीन घर विक्रीला आहे असे सांगितले. तसेच काही दिवसांनी वर्धा येथील स्वागत कॉलनीतील घराचे सुरु असलेले बांधकाम दाखविले. सुरेखा यांना ते बांधकाम आवडल्याने घर खरेदी करायचे असल्याचे सांगितले. सुनिलने फोन करुन ३० लाख रुपयांची व्यवस्था करा; घर खरेदी करु असे सांगितले.

धनादेशाद्वारे दिली रक्‍कम

सांगितल्‍यानुसार सुरेखा गजभे हिने सुनिल शेंडे याला ३ मे २०२१ ते १९ जून २०२१ या कालावधीत तब्बल २५ लाख ९० हजार ४७ रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे दिली. मात्र, सुनिलने घर खरेदी करुन दिले नाही. सुरेखाने एक तर घर खरेदी करुन दे किंवा पैसे परत दे, असे म्हटले. मात्र, सुनिलने पैसे देण्यास टाळाटाळ केली. सुनिलने घर खरेदी करुन देण्याचे नावे फसवणूक केल्याने सुरेखाने याबाबतची तक्रार सेवाग्राम पोलिसात दिली. पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Bharat Gogawale emotional reaction: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT