Wardha Crime Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime : ज्वेलर्स दुकानांसह चार दुकाने फोडली; रोकड लांबविली, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Wardha News: सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे गाव चोरट्यांच्या दहशतीखाली सापडले आहे. दुकानांमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: केळझर येथील बाजार चौकातील ज्वेलर्सच्या दुकानांसह चार दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य करत दोन दुकानातील रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली. तीन दिवसांत केळझर येथे सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्यामुळे गाव चोरट्यांच्या दहशतीखाली सापडले आहे. दुकानांमध्ये चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

वर्ध्याच्या केळझरच्या बाजार चौकात असलेले येथील योगेश हाडगे यांचे ज्वेलर्सचे दुकान लागून असलेले पवन इंगोले यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपी आहे. तसेच शांताराम तेलरांधे यांचे किराणा दुकान व गणेश गुंडे यांचे गणेश मेडिकल या चार दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत आपला डाव साधला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत चार दुकानांमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

दोन दुकानांमधून लांबविली रोकड 

दरम्यान चोरी झालेल्या दुकांनामधील शांताराम तेलरांधे यांच्या दुकानातील गल्ल्यात ठेवलेले रोख पंचवीस हजार रुपये व पवन इंगाले यांच्या दुकानातून दहा हजार रुपये व काही महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. तर हाडगे ज्वेलर्स व गणेश मेडिकलच्या दुकानात सोन्या- चांदीचे दागिने किंवा रोकड काहीच चोरट्यांच्या हाती लागले नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने तेथून परतावे लागले.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
पोलिसांनी चोरट्यांकडून लक्ष केलेल्या हाडगे ज्वेलर्स व गणेश मेडिकल या दुकानांतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सदर चोरीची घटना पहाटे तीन ते साडेतीन वाजताची असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच चोरट्यांची संख्या तीन असल्याचे बोलले जात आहे. यातील एक चोरटा दुकानात चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT