Bogus Cotton Seeds Saam tv
महाराष्ट्र

Bogus Cotton Seeds : ५० लाखांचे कपाशीचे बोगस बियाणे जप्त; एकजण ताब्यात, वर्धा कृषी विभागाची कारवाई

Wardha News : सेलू तालुक्यातील झडशी टाकळी येथे केली. कृषी विभागाने छापा टाकत केलेल्या कारवाईदरम्यान एक व्यक्ती कारमध्ये बनावट कपाशी बियाणाच्या पिशव्या भरताना रंगेहात मिळून आला. ५० लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: कापसाची लागवड करण्यासाठी अद्याप काही दिवसांचा कालावधी असून बियाणे विक्रीच्या अनुषंगाने मार्केटमध्ये बियाणे आले आहेत. मात्र आतापासूनच मार्केटमध्ये बोगस बियाणे आणले जात आहेत. त्यानुसार राज्यात प्रतिबंध घातलेल्या एचटीबीटी बियाणांची चोरट्या मार्गाने साठवणूक करून पॅकेजिंग लेबलिंग करून विक्री करणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पर्दाफाश केला. 

वर्ध्याच्या मौजा टाकळी (झडशी) येथे गोपाल पारडकर याने प्रतिबंधित असलेले बनावटी कपाशीचे बियाणे गुजरात येथून आणत साठवणूक केली. एवढेच नाही तर कपाशी बियाणाचे पॅकिंग व लेबलिंग करून अवैद्यरीत्या चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. याबाबतची माहिती पोलिसांना देत सेलू येथील विकासनगरात एका प्लॉटवर, टीनाचे शेड तयार केलेल्या गोडाऊनवर छापा टाकला. 

छापा टाकत एकाला घेतले ताब्यात 

सेलू तालुक्यातील झडशी टाकळी येथे केली. कृषी विभागाने छापा टाकत केलेल्या कारवाईदरम्यान एक व्यक्ती कारमध्ये बनावट कपाशी बियाणाच्या पिशव्या भरताना रंगेहात मिळून आला. गोपाल सुरेश पारडकर (वय ३५, रा. टाकळी, झडशी) याला अटक केली. या ठिकाणाहून विविध कंपन्यांची पॅकेजिंग केलेली १४६६ पाकिटे, ११८५ किलो खुले बियाणे तसेच अन्य साहित्य, असा ५० लाख ३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

बोगस बियाणांचे गुजरात कनेक्शन 

दरम्यान गतवर्षी म्हसाळा परिसरात बोगस बियाणांच्या साठा जप्त केला होता. त्यातही गुजरात कनेक्शन समोर आले होते. आता झडशी टाकळी येथे केलेल्या कारवाईत पुन्हा गुजरात कनेक्शन पुढे आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल गुजरात येथील जस्सूभाई पटेल यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे. पॅकिंग व लेबलिंग केलेला मुद्देमाल वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केला असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्डकप खेळणार का? अजित आगरकर पहिल्यांदाच इतका स्पष्ट बोलला

Saturday Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ कार्य हातून घडणार; ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Maharashtra Live News Update: वसुबारसच्या निमित्ताने रायगडमध्ये गाय आणि वासराच्या पुजनाला माहिलांची गर्दी

SCROLL FOR NEXT