Wardha News Bribe Trap Saam tv
महाराष्ट्र

Bribe Trap: कार्यकारी अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक; घरात सापडली साडेसहा लाखाची रोकड

कार्यकारी अभियंत्यास १ लाखांची लाच स्विकारताना अटक; घरात सापडली साडेसहा लाखाची रोकड

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : शासकीय वृक्ष लागवडीचे ५० लाख रुपयांचे देयके मंजूर करण्यासाठी (Wardha News) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बुब (वय ५७) यांना एक लाख रुपयांची लाच (Bribe) स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही कारवाई वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने केली. (Breaking Marathi News)

पिपरी (मेघे) येथील रहिवासी तक्रारदार यांच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्ष लागवडीचे पूर्वी तीन टप्प्यांचे देयके मिळाले होते. चौथ्या टप्प्यांतील ५० लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब हे तक्रारदाराला त्रास देत होते. तसेच मंजूर देयकावर पाच टक्क्यांची मागणी करु लागले. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास असर्मथता दाखविली असता देयकं काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता बुब टाळाटाळ करीत होते. अखेर प्रकाश बुब याने १ लाख रुपयांची मागणी केली.

छापा टाकत पकडले

ठरल्याप्रमाणे आज तक्रारदार कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याच्या निवासस्थानी एक लाख रुपये घेऊन गेला. प्रकश बुब याने लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी छापा मारुन लाच स्विकारताना रंगेहात पकडले. आरोपी प्रकाश बुब याला लाचलुचपत विभागाने अटक करुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

घरात ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम

कार्यकारी अभियंता प्रकाश बुब याने तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच स्विकारताना पोलिसांनी अटक केली. दरम्यान त्यांच्या घराची तपासणी केली असता लाचेच्या रकमे व्यतिरिक्त त्याच्या घरात ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम मिळाली. ती रक्कम व्हिडीओग्राफी करुन जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य, प्रदीप कुचनकर, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT